ग्रोमिक्स - पी के हे एक पर्यावरणपूरक बुरशीनाशक असून जमिनीतील स्फुरद विरघळवण्याचे, पिकांची जोमदार वाढ करण्याचे तसेच पिकांमधील आंतरिक रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे काम करते. यामध्ये जमिनीत वास्तव्य करणारा सुडोमोनास फ्लुरेसन्स हा जिवाणू पिकांच्या मुळांमध्ये जाळे तयार करून रोगकारक बुरशीचा स्पर्धात्मकरीत्या तसेच वेगवेगळी विषकारक रसायने तयार करून प्रतिकार करते. हे जैविक बुरशीनाशक जमिनीद्वारे होणाऱ्या रोगांपासून तसेच पिकांवर वाढणाऱ्या कृमीपासून संरक्षण करते.