NPK पॉवर जिवाणू खत हे ऑझोटोबॅक्टर आणि पी. एस. बी. म्हणजेच स्फुरद विरघळवणारे जिवाणूंचे मिश्रण आहे. या मिश्र जिवाणू खतामध्ये ऑझोटोबॅक्टर या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंचा समावेश असून हवेतील वायूरूप स्वरुपातील नत्र पिकांना उपलब्ध करुन देते त्याच बरोबर पी. एम. बी. या स्फुरद विरघळवणारे जिवाणू म्हणजेच बॅसिलस आणि सुडोमोनास या जिवाणूंचा समावेश असून हे जिवाणू जमिनीतील अविद्राव्य स्वरुपातील स्फुरदाचे विद्राव्य स्वरुपात रूपांतर करून ते पिकांना उपलब्ध करुन देतात. NPK पॉवर या जिवाणू खतामुळे नत्र युक्त तसेच स्फुरदयुक्त खतांची मात्रा 25% ते 30% बचत होते आणि उत्पादनात वाढ होते.