ऑसिटो - प्रो जीवाणू ऊस व इतर शर्करायुक्त पिकांमध्ये मुळांद्वारे प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात. हे जीवाणू आंतरप्रवाही असल्याने स्थिर केलेल्या नत्राचा पिकवाढीध्ये सर्वाधिक वापर होतो. ऊस पिकास ४० ते ५० टक्के नत्राचा पुरवठा होऊन १० ते २० टक्के उत्पादन वाढ होते.